यावल तालुक्यातील अंजाळे येथे एक आदर्श घटना घडली आहे. रूढी परंपरेने ग्रासलेल्या आपल्या संस्कृतीत 'वंशाचा दिवा असायला पाहिजे' म्हणून आपल्याला मुलगा असलाच पाहिजे, ही प्रत्येक कुटुंबाची अपेक्षा असते. म्हणून मुलीं ऐवजी प्रथम प्राधान्य मुलाला दिले जाते. कारण तो वंशाचा दिवा वाढवतो, अशी त्या मागची संकल्पना आहे. मात्र मुलगा नसला म्हणून काय झाले? अंजाळे येथील प्रमोद प्रल्हाद सपकाळे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना मुलगा नव्हता, तर त्यांची विवाहित मुलगी नीता वाघ रा. वाघोदा ता. रावेर हिने आपल्या वडिलांच्या निधनानंतर अत्यसंस्कार समयी अग्नीडाग दिला आणि भाची स्वाती वाघ हिने अंत्यसंस्कारात खांदा दिला. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार समयी जमलेले नातेवाईक आणि गावातील ग्रामस्थांचे या दुःखद समयी कौतुकाने आनंदाश्रू वाहत होते. आपल्या वडिलांना मुलाप्रमाणे अग्नी डाग देणाऱ्या नीता वाघ यांचे आणि भाची स्वाती वाघ यांचे कौतुक होते आहे. नीता वाघ आणि स्वाती वाघने केलेल्या धाडसाचा इतरांनी आदर्श घ्यायला हवा अशी ही घटना म्हणता येईल.
9922693412
मुख्य संपादक :- पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा