भरधाव वाहनाच्या धडकेत नांदुऱ्याचे व्यापारी ठार ! कुंभमेळ्याला जाताना मध्य प्रदेशातील कटनीजवळ अपघात !


नांदुरा : मुरलीधर लड्ढा व त्यांची पत्नी
प्रयागराज येथे हे दुसऱ्या वाहनाने नांदुरा कुंभमेळ्यासाठी पत्नीसह येथून २० फेब्रुवारी खासगी वाहनाने असलेल्या जात रोजी प्रयागराज येथे नांदुरा कुंभमेळ्यासाठी येथील भाविक किराणा निघाले होते. व्यापाऱ्याला भरधाव बोलेरो वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात व्यापाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मध्य प्रदेशातील कटनीनजीक घडली.

नांदुरा येथील बालाजी सुपर मार्केटचे मालक सुभाष मदनलालजी लड्डा (वय ६०) आणि त्यांची पत्नी सरला रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास मध्य प्रदेशातील कटनीनजीक पोहोचले. त्यावेळी सुभाष लड्ढा यांच्या वाहनात आवाज येत होता. त्यामुळे त्यांनी आपल्या चालकाला वाहन थांबविण्यास सांगितले. ते खाली उतरून वाहनात आवाज कशाचा येत आहे हे पाहात होते. त्याचवेळी
मागून भाजीपाला घेऊन भरधाव येणाऱ्या मालवाहू बोलेरो वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये १५ ते २० फूट फरपटत जाऊन गंभीर जखमी झाल्याने ते जागीच ठार झाले.

शुक्रवार, २१ फेब्रुवारी रोजी उत्तरीय तपासणीनंतर रात्री उशिरा त्यांचा मृतदेह नांदुरा येथे आणण्यात आला. आज, २२ फेब्रुवारी रोजी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, मुलगा, मुलगी, पत्नी असा आप्तपरिवार आहे.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने