"शेतकरी महिलेची कापुस खरेदी प्रकरणात नऊ लाख त्र्यान्नऊ हजार सहाशे रुपयांनी फसवणुक"

मलकापूर :-कापुस व्यापारी अमोल बबन घुले, उज्वला भगवान घुले, भगवान बबन घुले, बबन सुखदेव घुले या चौघांनी संगनमत करून भावकितीलच बेबी नीना घुले या शेतकरी महिलेची नऊ लाख त्र्यान्नऊ हजार सहाशे रुपयांनी फसवणुक केल्याची ऑनलाईन तक्रार पिडीत महिलेने मलकापूर ग्रामीण पोलिस स्टेशन ला काल दिनांक १४ फेब्रुवारी रोजी दाखल केली आहे.
सविस्तर वृत्त असे की ग्राम भालेगाव (रण) येथील तक्रारदार शेतकरी महिले चा मागील दोन वर्षांचा एकशे दहा क्विंटल चाळीस किलो कापूस अमोल बबन घुले व इतर यांनी नऊ हजार रूपये प्रति क्विंटल प्रमाणे एका महिन्याचे करारा वर विकतघेतला होता सदर कापसाच्या मोबदला रूपये नऊ लाख त्र्यान्नऊ हजार सहाशे एका महिन्यात तक्रारदार महिलेस घरी आणून देऊ असे वरील कापसाच्या व्यापाऱ्यांनी सांगीतले होते.
एका महिन्यानंतर सदर मोबदला न देता पैसे मागितल्यास व पोलिसात तक्रार दिल्यास गैर अर्जदारांनी पीडित महिलेस अश्लील शब्दात शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.
आमचे पोलीस खात्याशी व राजकीय क्षेत्रात घनिष्ठ संबंध असून आमचे कोणीही वाकडे करू शकत नाही, असे म्हणून गैरअर्जदारांनी पीडित शेतकरी महिलेला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. अशा आशयाची तक्रार पीडित शेतकरी महिलेने मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली आहे.

बातम्या जाहिराती करिता संपर्क :- 
9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने