मलकापूर तालुका मराठी पत्रकार परिषदेची बैठक संपन्न !



मलकापूर :-  दिनांक २८ फेब्रुवारी २०२५ रोजी मलकापूर येथे स्थानिक विश्रामगृहात मराठी पत्रकार परिषदेची बैठक संपन्न झाली

या बैठकीचे अध्यक्ष स्थानी जेष्ठ पत्रकार रमेश भाऊ उमाळकर, मार्गदर्शन म्हणून जेष्ठ पत्रकार हरिभाऊ गोसावी हे होते तसेच या बैठकीचे आयोजन मराठी पत्रकार परिषदेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष यांच्या आदेशाने मलकापूर तालुका अध्यक्ष नारायण महादेव पानसरे व सचिव शेख आबिद बागवान यांनी केले या बैठकीत मराठी पत्रकार परिषद तालुका समिती चे पदाधिकारी नियुक्त करण्यात आले,

मराठी पत्रकार परिषदेचे तालुका संघटक, म्हणून करण विनोद झनके, तालुका उपाध्यक्ष संदीप भाऊ सावजी व सतीश भाऊ दांडगे, तालुका जनसंपर्क प्रमुख पदी अजय लक्ष्मण टप, (तालुका सोशल मीडिया प्रमुख) तालुका सहसचिव पदी दीपक इटणारे, तर तालुका कोषाध्यक्षपदी निलेश बाळू चोपडे यांची

निवड आविरोध एकमतानी करण्यात आली, तर तालुका सदस्य पदी पंकज मोरे, शेख निसार, रवींद्र वासुदेव गणगे मोहम्मद सरवर, किशोर सोनवणे, सैय्यद ताहेर, अशोक भाऊ वानखेडे, फहीम शेख, अनिल गोटी, कबीर शेख, व गजानन जैस्वाल यांची निवड करण्यात आली, या बैठकीत मलकापूर शहर व तालुक्यातील समस्त पत्रकार बंधू उपस्थित होते, अध्यक्षीय भाषणानंतर बैठक अतिशय उत्साहात संपन्न झाली.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने