निकषात न बसणाऱ्यांना लाभ दिल्याने दोषींवर कारवाई करा ! लाडकी बहिणी योजनेवरून जितेंद्र जैन यांची सरकारकडे मागणी !

 बुलढाणा : निकषात न बसणाऱ्यांना लाभ दिल्याने दोषीवर अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र एन. जैन यांनी केली आहे. कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात धाव घेणार, असा इशारा जैन यांनी दिला आहे.

या संदर्भात मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड करताना काही ठिकाणी निकषांची योग्य तपासणी, कागदपत्रांची पडताळणी व गृहचौकशी न करता राजकीय फायद्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे सरकारी निधीचा अपव्यय झाला असून, योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या पात्र महिलावर अन्याय झाला आहे. महिला व बालविकास विभागाच्या इतर योजनांमध्ये लाभार्थ्यांची गृहचौकशी व कागदपत्रांची तपासणी काटेकोरपणे केली जाते.

मात्र, या योजनेत असे झाले नाही. त्यामुळे महिला व बाल विकास विभागाचे प्रधान सचिव, आयुक्त, उपायुक्त व संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्यासह जबाबदार असलेल्या सर्व अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर भारतीय दंड संहितेच्या अधिनियमांनुसार अपहाराचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जितेंद्र जैन यांनी केली आहे.

संबंधितावर कारवाई झाली नाही तर नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने