मलकापूरमध्ये - एकाच रात्री चार-पाच घरे फोडली, वृद्ध महिलेच्या गळ्याला चाकू लावून दागिने लुटले !


मलकापूरः मलकापूर शहरातील बन्सीलाल नगर परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री चार ते पाच घरे फोडून मोठी चोरी केली. विशेषतः, एका वयोवृद्ध महिलेला धाक दाखवून तिच्या गळ्याला चाकू लावून चोरट्यांनी दागिने लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना 6 मार्चच्या मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास घडली. चोरट्यांनी एकामागोमाग तीन ते चार घरांना लक्ष्य करत चोरी केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, डॉग स्क्वॉडच्या मदतीने तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पोलीस अधिक तपास करत असून, लवकरच आरोपींना अटक केली जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

 बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने