नांदुरा :- ( पीपल्स टाईम्स वृत्तसेवा) तालुक्यातील धानोरा महासिद्ध गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पवन महादेव गव्हाळे (वय २५) या तरुणाने बीपीच्या तब्बल २०० गोळ्या सेवन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. गोळ्या खाल्ल्यानंतर पवन यांची प्रकृती अचानक गंभीर झाली. त्यानंतर त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, २३ एप्रिल रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी रुग्णालयातील कक्षसेवक सुदाम वसाने यांच्या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पवन गव्हाळे याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेने गावात शोककळा पसरली असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा