मलकापूर : शेतकरी कर्जमाफी, पेरणी ते कापणीपर्यंत खर्च एमआयईजीएस मधून करणे, दिव्यांग बांधवांना मासिक ६ हजार रूपये मानधन देण्यात यावे यासह आदी मागण्यांसाठी आज ११ एप्रिल रोजी रात्री स्थानिक आमदार चैनसुख संचेती यांच्या घरासमोर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात मशाल आंदोलन करण्यात आले.
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. आ. बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशान्वये, जिल्हा प्रमुख वैभवराजे मोहिते यांच्या मार्गदर्शनात आज ११ एप्रिल रोजी शेतकऱ्याचा आसुड लिहिणारे शेतकऱ्याच्या समस्येला वाचा फोडणारे महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती तसेच ज्या संविधानाच्या बळावर आमदार लोकशाहीचे प्रश्न सोडविण्यासाठी विधानसभेमध्ये प्रतिनिधीत्व करीत आहे. तो हक्क देणारे त्या संविधान निर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिलला आहे. या महापुरुषांच्या. विचारांचे स्मरण करुन देण्यासाठी सदरचे मशाल आंदोलन करण्यात आले.
या मशाल आंदोलनप्रसंगी तालुकाप्रमुख अजित फुंदे, शहर प्रमुख शालिग्राम पाटील, बलराम बावस्कर, जमीर शेख, कैलास मानकर, विजय कांडेलकर, राहुल तायडे यांचेसह पहारचे पदाधिकारी, कार्यकर्ते हजर होते.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा