मलकापूर :- मौ.बेलाड, ता. मलकापूर, जि. बुलढाणा या गावातील दलित वसती कामामध्ये निकृष्ठ दर्जाचे काम झाले असल्या कारणाने चौकशी समिती स्थापीत करुन या स्तरावरुन चौकशी करुन दोषीवर कार्यवाही व्हावी या हेतू ने 16.06.2025 रोजी पासून उपोषणाला बसलेल्या उपोषण कृत्यांनी 20 दिवसाच्या अवधी मध्ये चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती त्यामुळे दिनांक 23 जुलै रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास शासनाने पाठवलेल्या अधिकाऱ्यांनी फेर चौकशी सुरू केली असता उपोषण करते अनंता इंगळे सचिन इंगळे रवी इंगळे यांनी चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन बेलाड गावातील तीनही वार्डात स्वतः काँक्रिटीकरण झालेले विकास काम बद्दल अनेक ठिकाणी कमी लेयर चा वापर निर्देशनात आणून दिला तसेच रोडची कॉंक्रिटीकरण बद्दल प्रत्येक नोंद स्वतःच्या डोळ्याने लिहिताना बघितली त्यावेळी चौकशीसाठी लाभलेल्या अधिकाऱ्याकडून विचारपूस केली असता चौकशीचा अहवाल किती दिवसात मिळेल त्यावेळी अधिकाऱ्यांनी दिलेले उत्तर आठ ते दहा दिवसांमध्ये चौकशीचा अहवाल देण्यात येईल असे सांगितले
त्यावेळी उपोषणकर्त्यांनी चौकशीचा अहवाल आल्यावर जोशीवर कारवाई न झाल्यास टोकाचे पाऊल उचलल्या जाईल व त्यासाठी पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील अशी ग्वाही दिली
यावेळी वृत्तपत्रांशी बोलताना बेलाड येथील सामाजिक कार्यकर्ते अनंता कडूजी इंगळे म्हणाले बेलाड गावातील विकास कामे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास योजनेअंतर्गत करण्यात आले या कामात कामचुकार पना ,निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे खपउन घेतल्या जाणार नाही जो पर्यंत दोषींवर कारवाई होणार नाही तो पर्यंत गप्प बसणार नाही
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा