इच्छा मरणाची परवानगी देण्याची मागणी !


मलकापूर : येथील श्रध्दा कॉम्प्लेक्सच्या
बांधकामाबाबत वेळोवेळी तक्रार करूनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर मला इच्छा मरणाची परवानगी देण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे कॉम्प्लेक्समधील रहिवासी पारसमल हुकूमचंद जैन यांनी मुख्याधिकारी न. प. मलकापूर यांचेमार्फत केली आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, गेल्या काही वर्षापासून बुलढाणा रोडवरील श्रध्दा कॉम्प्लेक्समध्ये माझे तीन गाडे असून श्रध्दा कॉम्प्लेक्सचे बांधकाम जीर्ण झाल्याच्या तक्रारी वेळोवेळी प्रशासनाकडे केल्या आहेत. मात्र प्रशासनाने त्या तक्रारीला केराची टोपली दाखविली. गेल्या काही वर्षात अनेकवेळा त्या कॉम्प्लेक्सचा स्लॅब कोसळून खाली पडलेला आहे. उत्तर बाजून असलेली गॅलरी जिर्ण झाली असल्याने एखादी जीवित हानी व अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही तक्रारीमध्ये वेळोवेळी नमूद केले आहे. तरी सुध्दा याकडे दुर्लक्ष होत असल्याने अपघाती मृत्यूपेक्षा इच्छा मरणाची परवानगी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.


बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने