बुलडाण्यात युवकाचा चाकूने भोसकून खून !


बुलडाणा : शहरातील एका युवकाला चाकूने भोसकून खून करण्यात आला. बस स्थानकाच्या मागील भागात जांभरून रोडवर ही घटना घडली. मृतक युवकाचे नाव शुभम रमेश राऊत (वय २७) असून, आरोपीचे नाव ऋषी जवरे आहे. ही घटना खून २१ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजतादरम्यान राऊत कॉम्प्लेक्सजवळ नाईटी चौकात घडली.

दोघांमध्ये आधी वाद झाल्याचे समजते. ऋषी जवरे हा गुंड प्रवृत्तीचा असल्याचे समजते. तर शुभम हा बोथरा एमआरआय सेंटरमध्ये कामाला होता. शुभम आणि त्याचा मित्र बॉबी दोघे गावंडे हॉटेलमध्ये जेवत होते. दरम्यान, हातात चाकू घेऊन ऋषी त्या ठिकाणी पोहोचला. त्याचे कुणाशी तरी भांडण झाले होते. ऋषी यावेळी नशेत असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. तो कुणाला तरी चाकू मारेल, या भीतीने शुभम त्याच्याजवळ गेला. परंतु, भानावर नसलेल्या ऋषीने थेट
शुभमच्या छातीच्या चाकू मारला. शुभमने आणि बॉबीने दोघांनी मिळून याला प्रतिकार केला. परंतु, शुभम खाली कोसळला. यात बॉबीलासुद्धा पायाला लागले. प्रतिकारादरम्यान ऋषीलाही चाकू लागला. शुभमला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तो वाचू शकला नाही.
या दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात मोठी गर्दी उसळली होती. शुभमची आई, वडील, भाऊ आणि नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. पोलीसही दाखल झाले होते. मागील महिन्यात एक ऑगस्ट रोजी चिखली रोडवर सनी जाधवचा चाकू हल्ल्यात खून झाल्याची घटना घडली. दीड महिन्यात बुलडाण्यात हा दुसरा खून झाला आहे.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने