मलकापूर:- हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसा, आगामी काही दिवसांत बुलढाणा जिल्ह्याचा पारा ४००८ ते ४४०८दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत खालील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
महत्वाच्या सूचना व उपाययोजनाः
पाण्याचे सेवनः तहान लागलेली नसली तरीही जास्तीत जास्त पाणी प्यावे. प्रवास करताना सोबत पाण्याची बाटली नेहमी ठेवावी.
कामाच्या वेळाः दुपारी १२:०० ते ४:०० या वेळेत शक्यतो उन्हात बाहेर जाणे टाळावे. अत्यावश्यक काम असल्यास डोके झाकून (टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करून) बाहेर पडावे.
पेय आहारः शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी लिंबू सरबत, ताक, लस्सी किंवा ओआरएस (ORS) चा वापर करावा.
पोशाखः उन्हात बाहेर जाताना हलक्या रंगाचे आणि सैल सुती कपडे परिधान करावेत.
मुले आणि ज्येष्ठ नागरिकः लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि आजारी व्यक्तींनी प्रखर उन्हापासून बचाव करण्यासाठी विशेष काळजी घ्यावी. त्यांना उन्हात पार्क केलेल्या बंद वाहनांमध्ये सोडू नये.
उष्माघाताची लक्षणे आढळल्यास काय करावे?
जर कोणाला चक्कर येणे, मळमळणे, तीव्र डोकेदुखी किंवा जास्त ताप जाणवत असेल, तर त्यांना त्वरित सावलीत नेऊन थंड पाण्याने पुसावे आणि जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे.
"उन्हापासून स्वतःचा बचाव करा आणि सुरक्षित राहा."
तहसिलदार, मलकापूर
टिप्पणी पोस्ट करा