मागील चार ते पाच वर्षापासून गिरणी बेलाड या शिवारामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतामधील शेतमाल चे गंजीलाआग लावण्यात येते अशा प्रकारचा आरोप शेतकऱ्यांनी आज केलेला आहे
दिनांक 15 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास किमान 15 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शेतमालाच्या गंजा पेटवून अज्ञात व्यक्ती फरार झालेला आहे अशा प्रकारची ग्वाही स्थानिक ठिकाणच्या शेतकऱ्यांनी दिलेली आहे口。
या अगोदरही अनेक वेळा मलकापूर शहर पोलीस स्टेशन येथे स्थानिक ठिकाणच्या नागरिकांनी अज्ञात आरोपी विरोधात अनेक वेळा तक्रारी केलेले आहे तरीसुद्धा अजून पर्यंत या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा धीर किंवा कारवाई होताना दिसत नाही त्यामुळे आज शेतकरी पेटून उठला आहे
अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उपस्थित झालेले आहे शेती पेरण्यासाठी बँकेचे कर्ज कसे भरायचे, मजुरांच्या रोजंदाऱ्या कशा द्यायच्या तर आपल्या मुलांचे शिक्षण व मुलींचे लग्न याच शेत मालाच्या भरोशावर होते वरचेवर राबराब राबुन सुद्धा हाती काही आलं नाही यामुळे शेतकऱ्यांनी आपले दुःख व्यक्त केले आहेघटने ठिकाणी मलकापूर शहर पोलीस स्टेशन चे एपीआय करुणाशील तायडे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा सुरू केले
टिप्पणी पोस्ट करा