रेल्वे स्टेशन नांदुरा जवळ रेल्वे गाडी समोर येऊन तरुण युवकाची आत्महत्या।

 
दिनांक 15.02.2025 रोजी 6.30 वाजता पूर्वी रेल्वे स्टेशन नांदुरा की.मी.न.523/6 - 8 डाऊन मेन लाइन वर मालगाडी च्या इंजिन समोर येऊन एक अनोळखी युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली त्यावरून तात्काळ लोहमार्ग शेगाव पोलीस व नांदुरा येथील ओमसाई फाउंडेशन ऍम्ब्युलन्स सह घटनास्थळी हजर झाले. सदर मृतक हा अंदाजे 25 वर्ष, रंग गोरा उंची 5 फूट मध्यम बांधा पोपटी रंगाचे शर्ट व काला नाईट पॅन्टनेसनिस असून सदर मृतकाची ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांनी केले असून सदर मृतकाचे प्रेत मलकापूर येथील सरकारी दवाखाना येथे शितगृहात ठेवले आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क
Mo- 9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने