विष प्राशन केल्याने 42 वर्षीय महिलेचा मृत्यू, खामगाव तालुक्यातील घटना !


खामगाव  – हिंगणा उमरा (ता. खामगाव) येथील एका ४२ वर्षीय महिलेने विष प्राशन केल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. रजनी विजय जुमडे यांनी २० फेब्रुवारी रोजी अज्ञात कारणाने विष सेवन केले. प्रकृती बिघडल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून, पुढील तपास पोलीस हवालदार गणेश जाधव करीत आहेत.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने