दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शाळेबाहेरच हार्टअटकनं मृत्यू झालाय. ही धक्कादायक घटना कामारेड्डी जिल्ह्यात गुरूवारी सकाळच्या सुमारास घडली. शाळेत चालत जात असताना तिला हार्टअटक आल्याची माहिती समोर आली आहे. अवघ्या १६ व्या वर्षात हार्ट अॅटकमुळे मृत्यू झाल्यानंतर परिसरात शोक व्यक्त करण्यात येत आहे.
दहावीत शिकणाऱ्या श्रीनिधी हिचा हार्ट अॅटकमुळे मृत्यू झाला आहे. तेलंगणाच्या कामारेड्डी जिल्ह्यातील एका गावात ती राहत होती. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनिधी ही सकाळी शाळेत जात होती. शाळेत जात असताना तिच्या अचानक छातीत दुखू लागलं. तिला थोडावेळ अस्वस्थ वाटू लागलं. छातीत कळ आल्यानंतर ती क्षणात खाली कोसळली.
खाली कोसळल्यानंतर शाळेतील एका शिक्षकाने तिला पाहिलं. तिला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तिची तपासणी केली आणि प्राथमिक उपचार दिले. परंतू तिने प्रतिसाद न दिल्यामुळे तिला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दुसऱ्या रुग्णालयात श्रीनिधीचा हार्टअटकनं मृत्यू झाल्याचं घोषीत केलं.
श्रीनिधीचा मृत्यू झाल्यानंतर परिसरातील अनेकांना धक्काच बसला. श्रीनिधीसारख्या लहान मुलीचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्यानं अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच शाळेतील आणि विद्यार्थ्यांनी श्रीनिधीच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा