घरफोडी आरोपी पोलिसांच्या ताब्यात चंद्रपूर पोलिसांची जलद कारवाई

चंद्रपूर शहरातील महादेव मंदिराजवळ बाबूपेठ वार्ड येथे घरफोडीचा प्रकार उघडकीस आला असून, चंद्रपूर शहर पोलिसांनी जलदगतीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. फिर्यादी हे बाहेरगावी गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या शेजाऱ्यांनी घराचे कुलूप तुटलेला असल्याचे पाहिले. त्यांनी तात्काळ फिर्यादीला माहिती दिली. घरी परतल्यानंतर फिर्यादीने चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. अज्ञात आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन चंद्रपूर येथील अप क १००/२५ कलम ३०५ (अ),३३१ (३), (४) भारतीय न्याय संहीता अन्वये गुन्हा नोंद करताच तपास सुरू केला.पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास हाती घेतला.

गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या काही वेळातच संशयित आरोपी व्यंकटेश उर्फ व्यंक्या महेंद्र कोपेलवार (वय २१, रा. आनंद नगर, महाकाली कॉलरी, चंद्रपूर) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने साथीदारासोबत मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून ५८ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले. दरम्यान, त्याचा साथीदार फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावती एकुरके, पोलीस निरीक्षक, चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन यांच्या सूचनेनुसार पोउपनि संदीप बच्छीरे, पोहवा सचिन बोरकर, संतोषकुमार कनकम, भावाना रामटेके, कपुरचंद खरवार, इम्रान खान, रूपेश रणदिवे, दिलीप कुसराम, राहुल चितोडे, विक्रम मेश्राम आणि गुन्हे शोध पथकाने केली. फरार आरोपीचा शोध सुरू असून, पुढील तपास संतोषकुमार कनकम करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने