माता महाकाली नगर,येथील "त्या" अवैध घर बांधकामाला जमीन दोस्त करा न प कडे मागणी!



मलकापूर: शहरात अनेक ठिकाणी अवैध बांधकाम झाले असल्याचे समजते. अनेकानी न. प.चा कुठलाही बाधकाम परवाना न घेता अवैध पक्के आर. सी. सी. बांधकाम केले असल्याचे दिसत आहे. असेच एक अवैध बांधकाम माता महाकाली नगर येथील रहिवासी हंसराज प्रभाकर जावरे यांनी केले आहे. त्यांच्याकडे कुठलाही बांधकाम परवाना नाही शिवाय हंसराज जावरे यानी त्यांच्या प्लॉटच्या दक्षिण दिशेला लागून असलेली चार फुटाची सर्विस लाईन गहाळ करुन त्यावर पक्के अवैध बाधकाम केले आहे.
एकंदरीत हंसराज प्रभाकर जावरे यांनी न. प. मलकापूर कडून कुठलीही बांधकाम परवानगी घेतली नाही त्यामुळे न. प. चा लाखों रुपयाचा कर बुडला आहे. तसेच बाधकाम परवाना साठी लागणारा आर्थिक भरणा सुद्धा बुडवला आहे आणि सर्विस लाईन वरती बांधकाम करून टाऊन प्लॅनिंग च्या नियम अटींचे सुद्धा उल्लंघन केले आहे. सदर अवैध बांधकाम त्वरित जमीन दोस्त करावे व बुडवलेला शासनाचा कर व भरणा याची दंडासहीत वसुली करावी असे निवेदन प्रसन्न बबन येऊलकर रा. कुलमखेड, यांनी मुख्याधिकारी नगर परिषद, मलकापूर यांच्याकडे केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने