मोताळा : रोमीयोंनी अल्पवयीन मुलीचा पाठलाग केला. एवढ्यावरच न थांबता बळजबरीने तीच्यासोबत सेल्फी काढून सदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. ही घटना नुकतीच तालुक्यातील एका गावात घडली. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी दोघांवर पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
बोराखेडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी रस्त्याने जात असतांना दोन रोमीयोंनी वाईट उद्देशाने तीचा पाठलाग सुरु केला. नव्हेतर बळजबरीने तीच्या हात
धरुन तीच्यासोबत सेल्फी काढली. तसेच सदर फोटो समाजमाध्यमावर व्हायरल करुन बदनामी कली. ही बाब लक्षात येताच पीडितेच्या वडिलांनी बारोखेडी पोलिसांत तक्रार दिली. उपरोक्त तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी प्रविण प्रल्हाद चोपडे (वय २२), चेतन अनिल वाघोदे (वय २२) याच्याविरुध्द भारतीय न्याय संहिताचे कलम ७४, ७८, ३५१, २१३ (५) सहकलम १२ पोस्को अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कपले हे करीत आहेत.
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा