भालेगाव येथील शेतकरी महिलेस फसवणूक प्रकरणास वेगळे वळण !




प्रति,

मा.पोलीस निरीक्षक साहेब पोलिस स्टेशन मलकापुर ग्रामीण, ता. मलकापुर जि. बुलढाणा.
यांचे सेवेशी,
तकारदार - बावन सुगदेव घुले,वय ६५ वर्ष धंदा शेती रा. भालेगांव ता.मलकापूर जि. बुलढाणा.

मी तकारदार नम्रपणे कळवितो की,
१. मौजे भालेगांव रण येथील रहिवाशी असुन मौजे भालेगांव येथे शेत गट नं.७९ क्षेत्रफळ ०.८६ आर व गट नंबर ५ क्षेत्रफळ ०.८६ आर सातबारा असुन सदर शेती मी स्वतः वहिती करतो.
सन २०२३-२४ चे हंगामात सोयाबीन पिकाचा पेरा केला होता सन २०२४-२५ हंगामात मका, सोयाबीन व कपासीचा पेरा दोन्ही शेतात केला होता. मागील वर्षीचा व यावर्षीचा देखील धान्याला व कापसाचे पिकाला भाव नसल्यामुळे माझेकडे सोयाबीन व कपासीचा आणि मक्याचा माल पडुन होता. माझे गावातील वैभव निनाजी घुले निना डिंगाबर घुले, बेबी निना घुले, शेतमालाची उधारीवर खरेदी करीत असतात.दि.७.१२.२०२४ रोजी वैभव निनाजी घुले हे माझेकडे आले व तुमच्याकडील मका, कापुस व सोयाबीन चा माल मला ठाणे अंमलदार पो.स्टे. मलकापूर(ग्रामीण)एक महिन्याच्या उधारीवर पाहीजे आहे मी उधार माल घेत असल्यामुळे बाजारभावापेक्षा जास्त भाव तुम्हाला देण्यास तयार आहे त्यावेळी त्याने सोयाबीनला प्रति क्विंटल ६०००/-रूपये भाव, व मका २५००/- रूपये क्विटल आणि कापुस ८०००/- रूपये प्रति क्विंटल देण्याचे कबूल केले होते. मात्र मी त्याला म्हटले की, तु अजुन लहान आहे तुझे आईवडीलाला घेवुन ये आणि त्यांना हमी दयायला सांग तेव्हा मी म्हटले की त्याचा विचार मला करावा लागेल. त्यानंतर लगेच वैभव निनाजी घुले हा त्याचे वडील निना डिंगावर घुले व त्याची आई बेबी निना घुले यांना घेवुन माझे घरी आला तेव्हा त्याचे आई वडीलांनी वैभवने सांगीतल्याप्रमाणे तुमचा कापुस, मका आणि सोयाबीन ला भाव देण्याचे व मालाची रक्कम एक महिन्यानंतर देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे त्यांनी मला पैसे देण्याची खात्री दिल्याबददल निना घुले व बेबी घुले यांचेवर विश्वास ठेवुन दि.९.१२.२०२४ रोजी वैभव निना घुले याला मागील वर्षाचे सोयाबीन ३६ क्विंटल ४० किलो व यावर्षीचे सोयाबीन ९ क्विंटल ८० किलो असा एकुण ४६ क्विंटल २० किलो सोयाबीन प्रतिक्विंटल ६०००/- रूपये भावाने एकुण रूपये २,७७,२००/- चा सोयाबीनचा माल एक महिन्याचे उधारीवर दिला सदर माल वैभव घुले याने टाटा एक कंपनीचे वाहन कमांक एमएच ४६ ए एफ ८४०५ या वाहनात दोन वेळा भरूनघेवुन गेला. त्यानंतर दुसरे दिवशी दि.१०.१२.२०२४ रोजी माझे शेतातील माल मका एकुण वजन ४९ क्विंटल ८५ किलो प्रति क्विंटल २५००/- रूपये भावाने एकुण १,२४,६६५/- रूपयाचे व कापुस एकुण वजन १४ क्विंटल ७० किलो प्रतिक्विंटल ८०००/- रूपये भावाने एकुण रूपये १,१७,६००/- चा माल त्याने त्याचे वरील वाहनाने व एका डिसीएम वाहनामध्ये घेवुन गेला. अशा प्रकारे मी वैभव निना घुले, निना डिंगाबर घुले व बेबी निना घुले यांना एकुण ५,१९,४२५/- रूपयाचा वरील माल एक महिन्याच्या उधारीवर विकी केलेला आहे. त्यानंतर ठरल्याप्रमाणे दि.१०.१.२०२५ रोजी मी निना डिंगाबर घुले यास उधार मालाचे विक्रीचे पैशाची मागणी केली असता त्याने मला १० दिवसाची अजुन मुदत दया, मी तुम्हाला घरपोच पैसे आणुन देतो असे सांगीतले मात्र त्यापूर्वी त्याने पैसे न देता दिनांक ११.१.२०२५ रोजी माझा मुलगा नामे भगवान बाबन घुले याचे विरूध्द जिल्हा पोलिस अधिक्षक साहेब बुलढाणा यांचेकडे खोटी तकार केल्याचे मला पेपर मधील बातमी वरून समजले. त्यानंतर मी त्याला त्याबाबत विचारले असता निना घुले व त्यांची पत्नी बेबी निना घुले त्यांनी मला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली व त्यानंतर पुन्हा पैसे मागीतले तर तुझे मुलाला जेलमध्ये टाकीन व तुला एखादे दिवशी जिवाने मारून टाकीन अश्या धमक्या दिल्या तेव्हा त्यावेळी तेथे हजर असलेला स्वप्नील प्रल्हाद भालेराव याने समजावुन सांगीतले की, जे झाले ते जावु दया वाटेल तर अजुन एक महिन्याचा वेळ घ्या पण त्यांचे कष्टाचे पैसे आहेत ते त्यांना देवुन टाका असे समजावुन सांगीतले व त्यानंतर एक महिना होवुनही निना घुले, वैभव घुले आणि बेबी घुले यांनी माझे मालाचे पैसे दिले नाही व माझी संगनमताने फसवणुक केली आहे. उलट माझा मुलगा भगवान बाबन घुले, अमोल बाबन घुले व माझी सुन उज्वला भगवान घुले यांचे सोबत माझे विरूध्द पोलिस स्टेशन मलकापुर येथे खोटी तकार बेबी निना घुले यांनी दाखल केली आहे. अशा प्रकारे मी माझे शेतातील कापुस, मका व सोयाबीन मालाची उधारीवर एकुण ५,१९,४२५/- रूपयाचा माझा माल घेवुन वैभव निना घुले, निना डिंगाबर घुले व बेबी निना घुले यांनी मला अजुनपर्यन्त पैसे दिले नाही व माझी संगमताने आर्थीक फसवणुक केली असल्यामुळे त्यांचे विरूध्द कठोर कारवाई करण्यात यावी व मला न्याय देण्यात यावा. ही विनंती.
ही कैफियत

ता.१८.२.२०२५

सही

बागन सुगेदव धुळे



बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने