वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांसाठी मलकापूर शहर वाहतूक पोलिसांनी आगळी वेगळी मोहीम हाती घेतली आहे. नेहमी दंड लावूनही अनेक वाहन चालक नियम पाळत नसल्याने वाहतूक पोलिस आता गांधीगरी करताना दिसत आहेत. जे वाहतुकीचे नियम नियमित पाळतात, त्यांना गुलाबाचे पुष्प दिले जात आहेत. तर जे नियम पाळत नाही त्यांच्यावर मात्र कार्यवाही होत आहे.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क :-
मलकापूर शहरात अपघाताचे प्रमाण जास्त झाले आहे त्या अनुषंगाने वाहतूक पोलिसांनी अभिनव उपक्रम राबवला आहे. वाहतूक पोलिसांनी शहरातील विविध रहदारी असलेल्या भागात नियम पाळणाऱ्या वाहन चालकांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे अभिनंदन केलं. तर नियम तोडणाऱ्या वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दलत्याच्यावर कार्यवाही केल्या जात आहे. ही मोहीम राबवत असताना पोलिसांनी वाहतूक नियमाबाबत जनजागृती केली आहे. हे नियम मोडल्याने अपघात होतात. अपघात टाळल्याचे असल्यास वाहन चालकाने नियमांचे पालन केले पाहिजे. असे पोलिस कर्मचाऱ्यांनी नागरिकांना गांधीगिरी करत सांगितले. विशेषतः विना हेल्मेट ट्रिपल सीट किंवा मद्य प्राशन करुन गाडी चालवल्यास लागणारा दंड आणि होणारी शिक्षा याबाबत लोकांना सतर्क करण्याचे काम मलकापूर वाहतूक पोलिसांनी केले आहे. त्यावेळी उपस्थिती श्याम शिरसाट, योगेश तायडे, सोनोने, शेख वसीम इत्यादी ट्रॅफिक पोलीस उपस्थिती होते.
9922693412
मुख्य संपादक :- पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा