शेतमालाच्या नुकसानीविरोधात हरीश रावळ यांच्या नेतृत्वात शेतक-यांचा मोर्चा व ठिय्या !

मलकापूरः बेलाड येथील शेतकऱ्यांच्या शेतमालाचे आग लावून नुकसान करणाऱ्या आरोपी विरुद्ध माजी नगराध्यक्ष हरीश रावळ यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय ते शहर पोलीस स्टेशन वर काढला मोची व मोयींचे रूपांतर ठिय्यातझाले होते. याबाबत सविस्तर वृत्त असे की मलकापूर तालुक्यातील बेलाड शिवारातील १५ ते २० शेतकऱ्यांच्या शेतातील शेतमालाच्या गंजींना लावलेल्या आगेत शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले यात विशेष म्हणजे शेतकरी हा रात्रंदिवस आपल्या शेतात राबराब राबतो त्यात मेहनत घेतो व्याजाने पैसे घेऊन शेतात पैसे लावतो मात्र या असल्या प्रकारामुळे बेलाड येथील शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे व यात ग्रामस्थांनी बेलाड गावातीलच ज्ञानेश्वर गवर नावाचा इसम पोलिसांच्या स्वाधीन केला असता त्या इसमाच्या आईने बेलाड येथील काही शेतकऱ्या विरोधात तक्रार दिली त्या प्रकरणी कुठल्याही शेतकऱ्यावर कारवाई होऊ नये व या ज्ञानेश्वर गवर वर तडीपारीची कार्यवाही व्हावी या करिता संतप्त शेतकऱ्यांनी माजी नगराध्यक्ष हरीश रावळ यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोच्यींचे रूपांतर पोलीस स्टेशन मलकापूर येथे
ठिय्यात करण्यात आले मात्र मलकापूर शहर पोलीस स्टेशन येथील डी बी पथकाचे इंचार्ज जे वर्गे यांनी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांची समजूत काली व त्या सर्व जमावाला योग्य रित्या त्या इसमावर कार्यवाही केल्या जाईल व असे आश्वासन हरीश रावळ व संतप्त झालेल्या जमावाला दिले यावेळी माजी नगराध्यक्ष हरिश रावळ, शेतकरी संघटनेचे दामोदर शमी, आदित्य रावळ, बेलाड परिसरातील शेकडो संतप्त शेतकरी उपस्थित होते.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने