दसरखेड टोलनाक्यावर चुकवला कोट्यवधींचा कर बनावट सॉफ्टवेअर : तेरा राज्यांत दोनशे नाक्यांवर टोल घोटाळा !



मलकापूर, उत्तर प्रदेश एसटीएफ ने महाराष्ट्रासह गुजरात व मध्य प्रदेशसह तेरा राज्यांमध्ये बनावट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून केला जाणारा टोल घोटाळा उघडकीस आणला आहे. कर चुकवेगिरीत महाराष्ट्रातील दोन टोलनाक्यांचा समावेश असून, एक नाका मलकापूरजवळील दसरखेडचा आहे. दोनशे टोल नाक्यांवर तब्बल दोनशे कोटी रुपयांचा कर बुडाल्याने एनएचएआयला मोठा आर्थिक फटका बसला आहे. उत्तर प्रदेशात टोल संदर्भातील दोन व्यवस्थापकांना अटक केली.
कसून चौकशीनंतर तब्बल दोनशे टोल नाक्यांवर फास्टॅग नसलेल्या वाहनधारकांकडून वसूल केलेला टोल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला न मिळता थेट घोटाळेबाज कंपनी किंवा कंत्राटदारांच्या खिशात जायचा. महाराष्ट्रातील मलकापूरजवळील दसरखेड टोल आणि खानिवडे टोल (दहिसर, सुरत) नाक्यावरही हा प्रकार घडला. या घोटाळ्याचा खास म्होरक्या आलोकसिंह आहे. दोन वर्षांपासून ही लूट सुरु असल्याचे त्याने एसटीएफला चौकशीदरम्यान सांगितल्याची माहिती
सूत्रांनी दिली. हा भ्रष्टाचार बाहेर आल्यानंतर महामार्ग प्राधिकरणच्या सर्व प्रादेशिक कार्यालयांना अलर्ट करण्यात आले आहे. याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. घोटाळ्यात टोल कर वसुली करणाऱ्या ठेकेदारांचाही सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे. एसटीएफने घोटाळ्यातील मास्टरमाइंडसह तीन जणांना अटक केली असून, उर्वरित घोटाळेबाजांचा तपास सुरू आहे. प्राप्त माहितीनुसार, आलोक सिंह हा सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. तो एनएचएआयला सॉफ्टवेअर बनवून
द्यायचा. त्याने ४२ टोलनाक्यांवर बनावट सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले. महाराष्ट्रात दोन, उत्तर प्रदेश ९, मध्य प्रदेश ६, राजस्थान, गुजरात, छत्तीसगडमध्ये प्रत्येकी ४, झारखंड ३. पंजाब, आसाम, वेगालला प्रत्येकी २ आणि ओडिशा, हिमाचल, जम्मू-तेलंगणात प्रत्येकी १, अशा तेरा राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात घोटाळेबाजाने सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लुटीचे केंद्र उघडले. त्याच्या दोन साथीदारांनी नंतर २०० टोल नाक्यांवर हे बनावट सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने