शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने दुकानातील साहित्य जळून खाक !


मलकापूर : शहरातील पंचमुखी हनुमान मंदिराजवळ कॉम्प्लेक्स मधील आशापुरा प्लायवूड मध्ये शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झाल्याची घटना आज दि. २६ फेब्रुवारी रोजी ८ वाजून ३० मिनिटांनी घडली. घटनेचे वृत्त प्रसारताच एकच खळबळ उडाली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की बुलढाणा रोडवरील पंचमुखी हनुमान मंदिराच्या समोरील कॉम्प्लेक्स मध्ये आशापुरा प्लाऊड चे दुकान आहे. या दुकान चे मालक हसमुख पटेल यांनी ७.३० वाजे दरम्यान दुकान बंद करून घरी निघून गेले असता ८ वाजून ३० वाजेच्या दरम्यान दुकानातून जळाल्यासारखा धूर बाहेर निघत असल्याचे बाजूला असलेल्या पंचमुखी दूध डेअरीचे संचालक अंकुश

वानखेडे यांना दिसले. त्यांनी तत्काळ आशापुरा क्लाऊड चे मालक हसमुख पटेल तसेच नगरपालिकेचे नगरसेवक राजू पाटील यांना यासंबंधी माहिती दिली.
त्या अनुषंगाने नगरपालिका अग्निशामक दलाचे वासुदेव भोपळे,यांच्यासह रामभाऊ येनकर, शेख मोईन शेख मुजम्मिल हे तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन शर्तीचे प्रयत करून आग विझविण्यात यश आले. अग्निशामक दल तात्काळ पोहोचल्यामुळे आगीवर लवकर नियंत्रण मिळवता आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने