मलकापुर:- तालुक्यातील काळेगाव (हरसोडा) येथील शेतात पिकांना पाणी देण्याचे कारणावरुन मुलाने वडीलास मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयाने दि.30 जानेवारी रोजी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा दंड न भरल्यास सहा महिन्याच्या साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग कोर्ट नं. 2 मलकापूर एस. एम. आहेर यांनी सुनावली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,तालुक्यातील काळेगाव (हरसोडा) येथील रामदास गुलगे यांनी त्यांचा मुलगा गोपाल गुलगे यास एक एकर शेती वहितासाठी दिली होती व पिकाला पाणी देण्याचे दिवस सुद्धा ठरवून दिलेले होते दि.09 जून 2019 रोजी दुपारी एक ते दीड वाजेच्या दरम्यान रामदास गुलगे शेतातील पिकांना पाणी देत असताना आरोपी मुलगा गोपाल गुलगे तेथे आला व मोटार बंद करून पाणी देण्याचे कारण स्वतःचे वडील म्हणजेच फिर्यादी रामदास गुलगे यांना काठीने मारहाण करून त्यांच्या तोंडावर बुक्का मारला त्यामुळे त्याचा दात पडला.रामदास गुलगे यांनी दिलेले फिर्यादीवरून एमआयडीसी दसरखेड पो.स्टेत भा.द.वि चे कलम 324 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला ऐएसआय मोहनसिंह राजपूत यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आरोपी विरुद्ध दोष ठेवून सदर प्रकरणात एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले सरकार पक्षातर्फे विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड कृष्णा गारमोडे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस दहा हजार रुपये दंड, दंड नभरल्यास सहा महिन्याच्या साधा कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे कोर्ट पैरवी म्हणून ए.एस आय प्रभाकर काळे यांनी काम पाहिले.
टिप्पणी पोस्ट करा