आगारात नविन बसेसच्या मागणीसह बसमध्ये अपंग,माजी सैनिक, पत्रकार यांना आरक्षित सिटवर जागा देण्याची मागणी
मलकापुर:- आगारातुन धावणाऱ्या एस.टी बसला गावाची पाटी (बोर्ड) नसल्याने विद्यार्थी तसेच वयोवृद्धांची हेळसांड होत असून डेपो मधील अलाउन्समेंट ही बंद असल्याने गाडी कोणत्या गावाला जाते हे ही कळत नसल्याने मानसिक, शारीरिक त्रास सोसावा लागत आहे, तसेच बसमध्ये अपंग, माजी सैनिक, पत्रकार आदींच्या आरक्षण सीटवर धडधाकट बसत असून त्यांच्या आरक्षित जागी अपंगांना व त्या लाभार्थ्यांना वाहकाने सिट उपलब्ध करून द्यावे तसेच आगारात अनेक गाड्या नादुरुस्त झाल्या असून जीर्ण अवस्थेत आहे म्हणून नवीन बस गाडयांसाठी पाठपुरावा करण्याची मागणी शिवसेना उ.बा.ठा चे शहर प्रमुख गजानन ठोसर यांच्या सह विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, शिवसेना उपशहर प्रमुख शे समद कुरेशी, कामगार सेना शहर प्रमुख हरिदास गणबास, वाहतूक सेना शहरप्रमुख इमरान लकी,शिवसेना उपतालुकाप्रमुख सुधाकर सापुर्डा दांडगे,किसान सेना तालुकाप्रमुख महादेव पवार, किसान सेना शहर प्रमुख सै. वसीम सै रहीम, चांद चव्हाण, सत्तार शाह,राजा कुरेशी,फैजान कुरेशी सह शिवसैनिकांची उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा