मलकापूर : नोव्हेंबर महिन्यात अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीला मलकापूर ग्रामीण पोलिसांनी तीन महिन्यांच्या शोधानंतर गुजरातमधील सुरत येथून दि.२३ फेब्रुवारी रोजी अटक केली. आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने त्याला २७फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
ही घटना १७ नोव्हेंबर २०२४ रोजी घडली होती. १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्यात आले, अशी पीडितेच्या वडिलांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
याप्रकरणी पोलिस निरीक्षक संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
यांचा कारवाईत सहभाग
• सहायक पोलिस निरीक्षक भगवान पारधी, पोलिस हवालदार गणेश सूर्यवंशी, पोकॉ. सचिन दासर आणि महिला पोलिस कर्मचारी वृषाली सरोदे यांचे पथक आरोपीचा शोध घेत होते.
२ गुप्त माहितीच्या आधारे पोलिस पथक २३ फेब्रुवारी रोजी गुजरातमधील सुरत येथे पोहोचले. तेथे किरण कडू धुरंदर (२७, रा. नरवेल) याला अटक केली. तसेच अल्पवयीन मुलीचीही सुटका करण्यात आली. आरोपीला मलकापूर येथे आणून गजाआड करण्यात आले.
पीडित मुलीच्या जबाबावरून २४ ● फेब्रुवारी रोजी आरोपीविरुद्ध 'पोक्सो' कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे २७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्याचे आदेश देण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत राठोड करत आहेत.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा