७५ वर्षीय वृध्दाचा डोक्यावर वार करून खून

लोणार :-शहरातील मंठा बायपास जवळील जैन ट्रेडसवर चौकिदाराचे काम करणाऱ्या ७५ वर्षीय वृध्दाचा डोक्यात धारदार वार करून खून केल्याची दुर्दैवी घटना ही १७फेब्रुवारी रोजी रात्री दरम्यान घडल्याने एकच खळबळ उडाली. सदर घटना ही १८ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडीस आली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, ठाणेदार निमिष मेहत्रे हे पोलीस कर्मचाऱ्यांनसह तातडीने घटना स्थळावर हजर होऊन पंचनामा केला.
मृतक बाबा मनसा पवार (वय अंदाजे ७५) हे देवठाणा ता. मंठा जि.जालना येथील रहिवासी असून लोणार येथील निलेश नवीन बेदमुथा यांच्या मंठा रोडवरील जैन ट्रेंडसवर चौकीदार म्हणून काम करीत होते. रात्री दुकानासमोर नेहमीप्रमाणे पलंगावर झोपले असता त्याच्या डोक्यात धारधार वार करून खून केल्याचे उघडीस आले. खाली रक्त सांडले होते. मृतकाचे नातेवाईक आल्याने शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला होता. विशेष म्हणजे ज्या दुकानात हे मृतक चौकीदार म्हणून काम करत होते. त्याचे नाव ही दुकानदाराना माहिती नसल्याचे दुकानदार सांगत होते. यावेळी घटनास्थलवर पीएसआय गणेश इंगोले, पोलीस कर्मचारी गणेश लोढे, नितीन खरडे, संजय जाधव, राहुल कायंदे, संतोष चव्हाण, सचिन घेवंदे यांनी पंचनामा केला व उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शन ठाणेदार निमिष मेहत्रे हे करीत आहे.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने