मलकापूर, दि. २ (प्रतिनिधी)
कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा, मंगल भवन, भिक्षुसंघ निवासस्थान, वाचनालय व सुशोभिकरणासाठी ५१ गुंठे जागा शासनाकडून मिळावी, यासाठी सर्वपक्षीय व समाजातील सर्व नेते, कार्यकर्ते यांच्या बैठकीचे आयोजन २ फेब्रुवारी रोजी मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात करण्यात आले होते. यात या मागणीसाठी संघर्ष समितीची स्थापना करून विविध ठराव समाज बांधवांच्या वतीने पारीत करण्यात आले.
सदर बैठक ज्येष्ठ पत्रकार सु.मा. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तर बैठकीला पिरीपा जिल्हाध्यक्ष राजाभाऊ सावळे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब दामोधर, भाजपा महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा प्रमिला इंगळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
यावेळी विधानसभा निवडणुकीत आ. चैनसुख संचेती यांनी बौध्द समाज बांधवांना जाहिररित्या वृत्तपत्रातून कषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेत डॉ. बाबासाहेव आंबेडकर यांचे स्मारक, मंगल कार्यालय, मुलींचे वसतीगृह बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. या बाबीची तात्काळ पुर्तता करण्यात यावी यासाठी बौध्द समाजातील सर्व पक्षीय दलित नेत्यांनी मागणी करावी, याकरीता याठिकाणी ठराव पारीत करण्यात आला. तर या प्रमुख मागण्यांची पुर्तता व्हावी यासाठी बौध्द समाजाची संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी सु.मा. शिंदे, उपाध्यक्ष बाळासाहेब दामोधर, माजी कृउबास संचालक आनंदा शिरसाट, प्रमिला इंगळे, महासचिवपदी राजाभाऊ सावळे.निमंत्रक म्हणून संजय दाभाडे तर सदस्य म्हणून गजानन तायडे, यशवंत कळासे, रमेश झनके, प्रकाश ताठे, सुनिल इंगळे, रेखाबाई तायडे, विलास तायडे, गजानन मोरे, आनंद तेलंग, तुळशीराम वाघ, विकास रायपुरे, रवि पवार, कुसुमबाई तायडे, वच्छलाबाई गोळे, पंकज मोरे, विद्यारामा तायडे, मिलींद हिरोळे, बेबीबाई झनके, पौर्णिमा इंगळे, विजय वाकोडे, प्रविण इंगळे, शहादेव इंगळे, नरेंद्र तायडे, विजय झनके, लक्ष्मण इंगळे आदींची निवड करण्यात आली. संघर्ष समितीच्या वतीने जोपर्यंत या सर्व मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे.
टिप्पणी पोस्ट करा