शिवभक्तांवर झालेल्या हल्ल्यातील गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी


शिवजयंती मिरवणुकीदरम्यान मयुर हुबे व विनोद काळे या शिवभक्तांवर हल्ला करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

या संदर्भात आज, २२ फेब्रुवारी रोजी पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांना निवेदन देण्यात आले. शिवजयंती मिरवणुकीत मयुर हुबे व विनोद काळे या शिवभक्तांवर सराईत गुन्हेगारांनी ९ वाजताच्या सुमारास फायटर व तलवारीने भ्याड हल्ला केला. या प्रकरणी चार आरोपींविरुद्ध पोलिसांनी विविध कलमान्वये गंभीर स्वरूपाचे गुन्हा दाखल केले. यामधील दोन आरोपी अटकेत असून दोन आरोपी अद्यापही फरार असल्याने त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.

धनराज मंगलसिंह राजपूत, अतुल प्रतापसिंग राजपूत, पवन राजपूत, ओम राजपूत यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचा

गुन्हा दाखल झाला असून चार आरोपींपैकी दोन आरोपी धनराज मंगलसिंह राजपूत, अतुल प्रतापसिंग राजपूत हे फरार आहेत.

धनराज मंगलसिंह राजपूत, अतुल प्रतापसिंग राजपूत, पवन राजपूत, ओम राजपूत है सराईत गुन्हेगार आहेत व त्यांची पार्श्वभूमी गुंडगिरीची असून यांच्या विरुद्ध विविध पोलीस ठाण्यांतर्गत आजपर्यंत अनेक गुन्हे दाखल आहेत व ते न्यायप्रविष्ठ आहेत, हे आरोपी समाजात भीतीचे वातावरण वारंवार निर्माण करत असतात.

अतुल राजपूत याच्याविरुद्ध अनुसूचित जाती विशेष न्यायालयाच्या आदेशात असे उल्लेख केले आहे की, हे प्रकरण निकाली लागण्यापर्यंत आरोपी अतुल राजपूत याचा मलकापूर, नांदुरा व मोताळा तालुक्यात प्रवेश बंद आहे. तरीही तो मलकापूर परिसरात फिरत असून अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे करत आहे. या आरोपींना तत्काळ अटक करून कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने