मलकापूर : वाकोडी ग्रा.प.हतील आदर्श नगर, साई नगर, भाग १,२, पवनसुत नगर, सरस्वती नगर, नालंदा नगर, आदि नगरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता वेळोवेळी जाणाऱ्या लाईट मुळे १०० के.व्हि च्या ट्रान्स्फार्मर ऐवजी २०० के. व्हि चा ट्रान्सफॉर्मर बसविण्याच्या मागणीसाठी शिवसेना शहरप्रमुख गजानन ठोसर, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपुत, शिवसेना उपशहरप्रमुख बाळू पोलाखरे, उपशहरप्रमुख शे. समद कुरेशी, कामगार सेना शहरप्रमुख हरीदास गणबास, वाहतूक सेना शहरप्रमुख इम्रान लकी, किसान सेना शहरप्रमुख सै. वसिम, मोहन सोनोने, मो. ईसाक तेली, सत्तार शाह, सह स्थानिक रहिवाशांनी म.रा.वि.वि कंपनी अधिकाऱ्यांना निवेदन देत २०० के.व्हि. चा ट्रान्सफॉर्मर बसवा व जुन्या डि. पी बॉक्स मध्ये नविन फ्युज बॉक्स बसवा अन्यथा शिवसेना (उ.बा. ठा) च्या वतीने आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता.
मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे २७ फेब्रुवारी रोजी नविन ट्रान्सफॉर्मर न बसविल्यास कार्यकारी अभियंता कार्यालयाची लाईट कट करण्याचा इशारा दिला होता. याबाबतची माहिती शहर पोलिसांना मिळाल्याने त्यांनी तगडा पोलिस बंदोबस्त लावला होता. तर दुपारी १२ वाजता शिवसेना पदाधिकारी व स्थानिक रहिवाशांनी कार्यकारी अभियंता मिश्रा यांची भेट घेऊन चर्चा केली असता त्यांनी तात्काळ नविन डि.पी मंजुर करुन नविन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे अभियंता गायकवाड यांना आदेशित केले, नविन डि.पी उभारणी करुन उपरोक्त नगरातील लोड वेगवेगळा होणार असल्याने या परिसरातील लाईट ये-जा करणार नसल्याचे कार्यकारी अभियंता मिश्रा यांनी सांगितले त्याप्रमाणे नविन डि.पी उभारणीचे काम पूर्ण झाल्याने रहिवासी ग्रामस्थांनी शिवसेना (उ.बा.ठा.) पदाधिकाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा