सुट्टीवर आलेल्या बीएसएफ जवानाचा अकस्मात मृत्यू ! (झोडगा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार)


मलकापूर : बीएसएफमध्ये कार्यरत मलकापूर तालुक्यातील जवानाचा दि.२७ रोजी पहाटे अल्पशा आजाराने अकस्मात मृत्यू झाला. त्या जवानाच्या पार्थिवावर राहत्या गांवी मलकापूर तालुक्यातील मौजे झोडगा येथे शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

तालुक्यातील मौजे झोडगा येथील रहिवासी उमेश शंकर आव्हाड + (वय ३४) हा बीएसएफ (सिमा सुरक्षा दल) च्या आसाममधील मासिमपूर येथे कार्यरत होते. दि.१ फेब्रुवारी रोजी ते

महिन्याच्या रजेवर घरी आले होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचे नातेवाईक व मित्र परिवाराच्या भेटीगाठी सुरू होत्या. दि.२६ रोजी अचानक पोटात दुखायला लागले. त्यामुळे उमेश आव्हाड या जवानाची प्रकृती अचानक बिघडली. उपचारासाठी ते खाजगी रुग्णालयात दाखल झाले. परंतू रात्री उशिरा पर्यंत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. कमी झालेला रक्तदाब वाढतच नसल्याने ते अत्यवस्थ झाले. रात्री २.३० वाजेच्या सुमारास त्यांना बुलढाणा येथील रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास तपासणी करून जवानास मृत घोषित केले. त्यामुळे नातेवाईकांना धक्का बसला. याबाबत गावात समजताच झोडग
पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली. जवानाच्या अकस्मात मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली.

दि.२७ रोजी मृत जवान उमेश आव्हाडच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून त्यांच्या राहत्या गावी झोडगा येथे आणण्यात आले. त्यांच्यावर संध्याकाळी शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शासनाच्या वतीने तहसीलदार राहुल तायडे यांनी पार्थिवाला अभिवादन केले. तर पोलिस निरीक्षक गणेश गिरी यांच्या नेतृत्वाखाली जवानाला हवेत तीन राऊंड गोळ्या झाडून मानवंदना देण्यात आली. यावेळी अनेक प्रशासकीय अधिकारी व ग्रामस्थांची उपस्थिती होती.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने