आदर्श नगरात जय गजानन मित्र मंडळाच्या वतीने होलीकोत्सव सण साजरा !


मलकापुरः- आदर्श नगरातील श्री संत गजानन महाराज मंदिरात सालाबादाप्रमाणे यंदाही जय गजानन मित्र मंडळाच्या वतीने होलीकोत्सव साजरा करण्यात आला.

गुरुवार दि. 13 मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजे दरम्यान आदर्श नगरातील नवदाम्पत्य सुरज कहाते, सौ. भाग्यश्री कहाते यांच्या हस्ते श्री संत गजानन महाराज मंदिरात श्रीं ची आरती करून होळीची कहाते दाम्पत्यांचे हस्ते विधीवत पूजा करून होलीकोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी आदर्श नगरातील जय गजानन मित्र मंडळाचे पदाधिकारी व रहिवासी ग्रामस्थ, महिला भगिनी यांची उपस्थिती होती.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने