मलकापुर :- गोकुलधाम येथे संगीतमय शिवपुराण कथेचे वाचन 15 मार्च पासुन सुरु करण्यात आले आहे.
या आयोजित करण्यात आलेल्या संगीतमय शिवपुराण कथेचे वाचन ह.भ.प संजय महाराज कोकरे यांच्या अमृततुल्य वाणीतुन सुरू झाले असुन सप्ताहात दररोज रात्री कीर्तनामध्ये दि. 15 मार्च शनिवार ह.भ.प शिवदास महाराज राहणे, दि. 16 मार्च रविवार कु. रोहिणीताई महाराज धाडे, दि.17 मार्च सोमवार ह.भ.प क्रिष्णा जोशी महाराज, दि. 18 मार्च मंगळवार ह.भ.प इंद्रायणीताई महाराज बगाडे, दि. 19 मार्च बुधवार ह.भ.प शालीकराम महाराज धाडे, दि. 20 मार्च गुरुवार ह.भ.प मोहन महाराज गारमोडे, दि.21 मार्च शुक्रवार ह.भ.प मधुकर महाराज निपाणेकर, दि.22 मार्च सकाळी 10 ते 12:30 ह.भ.पसंजय कोकरे महाराज यांचे काल्याचे कीर्तन करणार आहेत.
या शिवपुराण कथेची सांगता दि.22 मार्च रोजी होणार असून यामध्ये सर्व भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन गोकुलधाम नगरवासी यांच्या वतीने करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे विशेष सहकार्य म्हणून शिवसाई बहुउद्देशीय महिला मंडळ वाकोडी यांचे राहणार आहे.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा