नांदुरा : दहिगाव येथे १६ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास २२ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. मृत साश्री सुधीर मनस्कर (वय २२, रा. दहिव बु., जि. बुलढाणा, ह.५. दहिगाव) हिने राहत्या घरात स्लॅबवरील हुकला दोरी बांगून गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच फिर्यादी अविनाश वसंत सोनीने यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. फिर्यादी है सेतातून परतल्यानंतर घरी आराम करत असताना त्यांना शेजारी राहणारे राजू की पानी फोनद्वारे साक्षीने आत्महत्या केल्याची माहिती दिली, त्यांनी तातडीने घटनास्थली धाव घेतली असता साक्षी हिने गळफास घेतल्याचे स्पष्ट झाले. फिर्यादी यांच्या तोडी रिपोर्टवरून पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय वराडे यांनी मर्ग दाखल केल्य असून, ठाणेदार विलासराव पाटील यांच्या आदेशाने पुढील तपास पो. है. कॉ. गजानन इंगळे करत आहेत.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा