बुलढाणा रोडवरील तुटलेल्या दुभाजकाची व स्ट्रीट लाईट पोलची तात्काळ दुरुस्ती करा अन्यथा त्या पोल चा दफन विधी कार्यक्रम तिथेच उरकण्याचा शिवसेना (उ.बा.ठा) इशारा


मलकापुरः - शहरातील बुलढाणा
रोडवरील चाणक्य ट्रॅव्हल्स समोरील दुभाजकाला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुभाजक तुटून (स्ट्रीट लाईट) इलेक्ट्रिक पोल ही अर्धवट तुटला आहे सदर घटनेला वर्षभर उलटले असून त्यानंतरही अनेक अपघात या ठिकाणी झाले आहे मात्र याकडे सां. बा विभाग व बि.ओ.टी तत्त्वावर रस्ता देखभाल दुरुस्ती साठी घेतलेल्या बुलढाणा अर्बन ने साफ दुर्लक्ष केले आहे. तुटलेल्या त्या अर्धवट पोल ने मोठा अपघात होण्याची वाट प्रशासन पाहत असल्याने याबाबत आज शिवसेना (उ.बा.ठा) च्या वतीने सदर ठिकाणी जाऊन च्या वतीने सदर ठिकाणी जाऊन अर्धवट तुटलेल्या त्या (स्ट्रीट लाईट) पोलला व दुभाजकाला हार घालून या दुभाजगाचे व तुटलेल्या पोल चे नविन उभारणी चे काम तात्काळ आठ दिवसांत करा अन्यथा अर्धवट तुटलेल्या अपघात ग्रस्त (स्ट्रिट लाईट) पथदिवा पोलचा तिथेच खड्डा खोदून दफन विधी कार्यक्रम उरकण्यात येईल असा इशारा शिवसेना शहरप्रमुख गजानन ठोसर यांनी दिला आहे. या संदर्भात सां. बा विभाग अभियंता सचिन तायडे, बुलढाणा अर्बन मुख्य कार्यालय बुलढाणा यांना निवेदन देण्यात आले असुन निवेदनावर विधानसभा संघटक राजेशसिंह
राजपूत, तालुकाप्रमुख दिपक
चांभारे, शहरप्रमुख गजानन ठोसर,
उपशहर प्रमुख बाळू पोलाखरे,
उपशहरप्रमुख शकील जमादार,
कामगार सेना तालुकाप्रमुख राम थोरबोले, कामगार सेना शहर प्रमुख हरीदास गणबास, वाहतूक सेना शहरप्रमुख इमरान लकी, किसान सेना शहरप्रमुख सै. वसीम सै. रहीम, शिवसेना विभागप्रमुख गणेश सुशीर, चाँद चव्हाण, शेख फरहान, सै. मुशरफ सै सलीम, अयाज गौरी सह शिवसैनिकांची उपस्थिती होती.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने