चिखली :- तालुक्यातील शेळगाव आटोळ जवळ आज (२३ मार्च) दीड वाजता अवैध दारू विक्रेत्याने पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या दुचाकीला लाथ मारली, त्यामुळे झालेल्या अपघातात भागवत गिरी या पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर राम आंधळे गंभीर जखमी झाले. दोन्ही पोलीस अंढेरा पोलीस ठाण्यात कार्यरत होते. शिवणकर नावाचा अवैध दारू विक्रेता गाडीने दारू घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. मात्र, त्याने दुचाकीला लाथ मारल्याने पोलीस रस्त्याच्या कडेला झाडाला धडकले. जखमी राम आंधळे यांना उपचारासाठी आंधळे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, शिवणकर फरार झाला आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा