पोटच्या मुलानेच बापाचा केला खून; धोत्रा नाईक येथे कौटुंबिक वादातून खळबळजनक घटना !


अमडापूर :- २१ मार्च रोजी
दुपारी १ वाजेच्या सुमारास अंबा तालुक्यातील धोत्रा नाईक येथे पित्याचा पोटच्या मुलानेच खून केल्याची धक्कादायक घटना घडली. आरोपी आनंद सुरेश भांडवले (वय १७) याने आपल्या वडिलांचा दगडाने ठेचून खून केला असून तो सध्या अमडापूर पोलिसांच्या ताब्यात आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की सुरेश रमेश भांडवले (वय ४२) यांना दारूचे अतिव्यसन होते. दारूच्या नशेत ते नेहमी घरातील लोकांशी भांडण करत, शिवीगाळ व मारहाण करीत असत. सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्यांच्या मुलाने संतापाच्या भरात वडिलांच्या डोक्यात दगड मारून त्यांना ठार केले. घटनेनंतर सुनील गणेश भांडवले यांनी अमडापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वडिल त्रास देत असल्यामुळे त्यांचा मुलगा आनंदने "हा बेवडा आता उठणार नाही, मी त्याला कायमचा झोपवलं" असे सांगत खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून आरोपीला ताब्यात घेतले असून खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने