नांदुरा : क्षुल्लक कारणावरून पुतण्याने काकाची कुन्हाडीने हत्या केल्याची घटन तालुक्यातील सोनज इसचपूर येथे घडली. कुटुंबीयांसमोर काकांची हत्या करणारा पुतण्या नंतर पोलीस ठाण्यात हजर झाला. आज, २९ मार्च रोजी घडलेल्या या घटने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
शुभम बोके (२९, रा. सोनज इसबपूर, ता. नांदुरा, जि. बुलढाणा) असे आरोपी पुतण्याचे नाव आहे
गोयल मनोहर बोके (वय ४५, रा. सोनज इसबपूर, ता. नांदुरा) असे काकाचे नाव आहे. आरोपी शुभम बोके याच्याकडे ट्रॅक्टर आहे. मात्र, शेतीमध्ये कराक्याच्या कामांसाठी आणि खतांची वाहतूक करण्यासाठी काकाने आपला ट्रॅक्टर घेतला नाही, याचा शुभमला राग आला.
यामुळे त्याने आज काका गोपाल मनोहर बोके यांचे घर गाठले. तिथे जाऊन शुभम माने, शेतीच्या कामासाठी आणि खत वाहून नेण्यासाठी माझा ट्रैक्टर का घेतला नाही?' अशी विचारणा करत गोंधळ घातला. यावेळी
गोपाल बोंके यांचा मुलगा आणि पानी उपस्थित होते. त्यांच्यासमोरच घराच्या अंगणात काका-पुतण्यात कडाक्याचा बाद झालर यावेळी शुभम बोके माने रागाच्या भरात हातातील कुन्हाडीने काका मनोहर बोके यांच्यावर बालक हल्ला केला. कुन्हाडीचा वार मानेवर लागल्याने मनोहर बोके रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. त्यांना रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला
या घटनेनंतर शुभम हा नांदुरा पोलीस ठाण्यात स्वतः हजर झाला घटनेच्या
वेळी उपस्थित असलेला मनोहर बोके यांचा मुलगा विश्वजीत बोके याने नांदुरा पोलीस ताण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५२, १०३ (१), ११५ (२) नुसार गुन्हा दखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास नांदुरा ठाणेदार पोलीस निरीक्षक विलास पाटील करत आहेत.
दरम्यान, मलकापूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच तपासाच्या दृष्टीने सूचना दिल्या.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा