मलकापूर: शहरातील लक्ष्मीनगर परिसरातील शिवराज फायर सर्व्हिसेस येथे रविवारी सकाळच्या सुमारास ऑक्सिजन सिलेंडर टाकीत असताना अचानक स्पोट होऊन एकाचा मृत्यू झाला असून दोघे जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या दुर्घटनेत अनंत देशमुख (वय ४४) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा नातेवाईक गणेश देशमुख (वय २३) हे गंभीर जखमी झाले असून, ऑटो चालक महाजन हे किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर डॉ. अरविंद कोलते यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, ऑक्सिजन सिलेंडर एका ऑटोमध्ये टाकत असताना अचानक मोठा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की आजूबाजूच्या परिसरातही धक्का बसला. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा