संस्कृती परंपरा जतन करीता विप्र राजस्थानी महिला मंडळाने मोठ्या थाटामाटात गणगौर उत्सवाचे आयोजन !

मलकापूर - मारवाडचा सांस्कृतिक वारसा म्हणून दरवर्षी साजरा होणारा गणगौर उत्सव सोमवार 24 मार्च 2025 रोजी भव्य शोभा यात्रेचे आयोजन करून मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तर मूली भविष्य मध्ये सुयोग्य वर मिळावा या कामनेने गणगौर हा सणावर मध्ये उपवास करतात आणि विशेष पूजा करतात, तर अविवाहित मुली गणगौर सणाला उपवास करतात आणि पूजा करतात. गणगौर पूजेची गाणी गातात
मलकापूर शहरात सांस्कृतिक वारसा म्हणून दरवर्षी राजस्थानी विप्र महिला हा सण साजरा करतात.

यंदा गणगौरची मिरवणूक गजानन
महाराज मंदिर गांधी चौक येथून
शहरातील प्रमुख मार्गाने हनुमान चौक
बिर्ला गणेश मंदिरा येथे निघाली. या
मिरवणुकीत इसर गणगौरच्या झाकी
तर जीवन ईसर गनगौर ने सर्वांचे लक्ष
वेधून घेतले. मिरवणुकीत संस्कृत
वाद्यां यांच्या गजरात मलकापूर
शहरातून निघाला. मिरवणूक मार्गावर
पुष्पवृष्टी करण्यात आली, फटाक्यांची
आतषबाजी करण्यात आली, ठिक
ठिकाणी अल्पो आहाराचे नियोजन
करण्यात आले.
हिंदू सांस्कृतिक वारसा गणगौर उत्सव होळीच्या दुस-या दिवसापासून सुरू होऊन गवार पूजनाने यांची सांगता होते. यापूर्वी तीजच्या पूर्व संध्येला महिला मुली कडून लोटीचा सण गवाराची पूजा करणाऱ्या तीजनी पंधर वाड्या नंतर गवार मातेला पाणी देण्यासाठी वेगवेगळ्या धातूंनी बनवलेली पात्रे घेतली. पवित्र जलाशयांच्या कुंड पाण्याने लोटी भरल्यानंतर, सर्व महिला एकत्रित येउन गवार पूजेच्या ठिकाणी गौर मातेला जल अर्पण करण्या करिता गाजावाजाने येतात व विधी पूर्ण केला जातो.
गणगौर उत्सवानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांची माहिती देताना कोमल शर्मा म्हणाल्या की, गणगौर हा सण साजरा करण्याची आपली मारवाडची संस्कृती आहे. याची सुरुवात होळी दहनाने होते आणि 16 दिवस विवाहित स्त्रिया आणि मुली गवार मातेची पूजा करतात आणि 16 दिवसांनंतर चैत्र शुक्ल तीजला गणगौर सणाच्या दिवशी उद्यापण करुन समाप्त होते. या उत्सवात सर्व स्त्रिया एकत्रितपणे गणगौरची पूजा करतात आणि गणगौरवर गाणे आणि नृत्य देखील करतात आणि या 16 दिवसांसाठी वेगवेगळ्या महिला त्यांच्या घरी विशेष नैवेद्य प्रसादाचे आयोजन करतात. याने समाजाच्या महिलांचे एकत्रीकरण शक्ती करणे होते नयना पंडित म्हणाल्या. की आपण आपली हिंदू संस्कृती विसरत चाललो आहोत, परकीय संस्कृतीचे अनुकरण करत आहोत आणि आपली संस्कृती टिकवणे हे आपले काम आहे आणि याच उद्देशाने गेल्या 9 वर्षांपासून गणगौर उत्सव विप्र जागृती महिला मंडळ द्वारे साजरा केला जात आहे. हा कार्यक्रम यशस्वी आणि सुंदर करण्यासाठी राजस्थानी विप्र गणगौर उत्सव समितीच्या महिलांनी खूप परिश्रम घेतले, उत्सवात समाजातील महिला, तरुणी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने