शिवसेना उबाठाच्या जिल्हाप्रमुखासह १२ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल !भैय्याजी जोशींचा पुतळा जाळल्याप्रकरणी मलकापूरमध्ये पोलिसांची कारवाई !


मलकापूर : मराठी भाषेच्या अवमानप्रकरणी भैय्याजी जोशी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोड्याने मारून तो जाळल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुखासह १२ पदाधिकाऱ्यांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

भैय्याजी जोशी यांनी करून मराठी भाषेचा अवमान केल्याप्रकरणी १० मार्च रोजी तहसील चौकात शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने भैय्याजी जोशी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपला जोड्यांनी मारून तो जाळण्यात आला होता. पक्षाचे जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, तालुकाप्रमुख दीपक चांभारे, शहरप्रमुख गजानन ठोसर यांच्या नेतृत्वात ही आंदोलन करण्यात आले होते.

या आंदोलनामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या जमाबंदी आदेशानुसार मुंबई पोलीस कायद्याचे सन् १९५१ चे उल्लघंन झाले. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मंगेश चरखे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

या फिर्यादीवरून जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, विधानसभा संघटक राजेशसिंह
राजपूत, तालुकाप्रमुख दीपक चांभारे, शहरप्रमुख गजानन ठोसर, उपशहरप्रमुख शे. समद कुरेशी, उप शहरप्रमुख शकील जमादार, किसान सेना शहरप्रमुख सै. वसीम, वाहतूक सेना शहर प्रमुख इमरान लकी, चांद चव्हाण, गणेश सुशीर, श्याम जाधव, राजेंद्र काजळे, सत्तार शहा यांच्याविरूद्ध अप.न.१२३/२०२५ कलम १३५ बी.पी. अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने