लखानी परिवाराचा स्तुत्य उपक्रमः मुक्या प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी २०० फ्लेक्सिबल वॉटर टप करणार वाटप !


मलकापूर : उन्हाळ्याची सुरुवात होताच मुक्या प्राण्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते ही बाब लक्षात घेऊन आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो अशा उदात्त भावनेने शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे लखानी परिवारातर्फे २०० फ्लेक्झिबल वॉटर टप तयार करून तालुक्यात हे टप वाटप करण्यात येत आहेत.

उन्हाळ्याची सुरवात होताच मलकापूर परिसरात विशेषतः शहरी भागात पाण्याची समस्या नेहमीच उद्भवत असते. पिण्याच्या पाण्यासाठी सुध्दा नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागते. अशा परिस्थितीत शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे लखानी परिवारातर्फे गतवर्षी

उन्हाळ्यात शहरातील विविध ठिकाणी जवळजवळ दररोज २०० पाण्याच्या कॅनची व्यवस्था करून पाणपोई तयार करण्यात आल्या होत्या. पशु पक्षी व प्राणी सुध्दा समाजाचा महत्त्वाचा घटक आहे व या मुक्या प्राण्यांची काळजी घेणे हे माणसांचे कर्तव्य आहे. या ऊक्तीनुसार पक्षांना कुंड्या तयार करून पाण्याची व्यवस्था करण्यात येत असते. अशातच यावर्षी

उन्हाळ्याला सुरुवात होताच मुक्या प्राण्यांसाठी ठीक ठिकाणी पाण्याची व्यवस्था करता यावी म्हणून २०० फ्लेक्सिबल वॉटर टप तयार करण्यात येऊन मोफत स्वरूपात वाटप करण्यात येत आहे. पावसाळ्यामध्ये सुध्दा रेन हार्वेस्टिंग होऊन पाण्याचा संचय व्हावा याकरिता लखानी परिवारातर्फे रेन हार्वेस्टिंगचे सिस्टम सुध्दा वाटप करण्यात आले होते.

समाजाप्रती दायित्व म्हणून करावयाच्या कार्याचे नियोजन आम्ही आमच्या वार्षिक नियोजनांमध्येच तयार करीत असतो. वर्षभरात जसे होईल तसे सामाजिक उपक्रम राबवित समाजाचं देणं देण्याचा प्रयत्न आम्ही करीत असतो.
             - मनीष लखानी, मलकापूर

या उपक्रमात ज्यांनाही सहभागी व्हायचे असेल किंवा मुक्या प्राण्यांना पाण्याची व्यवस्था आपल्या परिसरात करावयाची असेल त्यांनी मनीष लखानी यांच्याशी संपर्क साधावा. त्यानुसार योग्य त्या ठिकाणी हे वाटर टप पोहोचवण्यात येतील. असे आवाहन सुद्धा केले आहे. राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून या उपक्रमांमध्ये परिसरातील नागरिक सुध्दा सहभागी होत आहेत.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने