हकीमी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची लूट : ॲड. हरीश रावळ


मलकापूर : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत ऑपरेशन करुन पेशंट दगावल्यानंतर सुद्धा पैशाची मागणी करून मृतदेह तब्बल सहा तास अडकविल्या प्रकरणी ९ एप्रिल रोजी शहरातील हकीमी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल मध्ये गदारोळ झाला होता. त्या संदर्भात हॉस्पिटलचे व्यवस्थापक यांनी पत्रकार परिषद घेत माल-पाणी मागीतल्याचे आरोप तथ्यहीन असल्याचे सांगितले. तर १३ एप्रिल त्या विरोधात अॅड हरीश रावळ व शिवसेना (उ.बा.ठा) शहर प्रमुख गजानन ठोसर सह मृतक कमलाबाई यादव इंगळे यांचा मुलगा योगेश यादव इंगळे, जावई प्रदिप वराडे यांनी पत्रकार परिषद घेऊन हकिमी हॉस्पिटल प्रशासन एक प्रकारे खोटे बोलत असून ९ एप्रिल रोजी पहाटे पावणे चार बाजे दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आईचे निधन झाले तेव्हा पासून सकाळी नऊ बाजेपर्यंत त्यांनी या पाच तासात एक वेळा. नव्हे तब्बल चार वेळा अनुप मालपाणी यांनी चाळीस हजार रुपयांची मागणी करीत मृतदेह अडकवून ठेवला होता. सकाळी नऊ वाजता म्हणूनच आम्ही अँड हरीश रावळ, शिवसेना शहरप्रमुख गजानन ठोसर यांना मोबाईल वरून सर्व प्रकार सांगितला अवघ्या पाच मिनिटांतच हॉस्पिटल गाठत हरीश रावळ, गजानन ठोसर यांनी मृतदेह अडविल्याचा जाब विचारत हॉस्पिटल तोडफोड करण्याचा मालपाणी यांना इशारा देत आईचा मृतदेह उचलून स्ट्रेचरद्वारे अॅम्ब्युलन्स मध्ये ठेवला. योजनेतूनही पैसे व रुग्णांकडून ही पैसे उकळण्याचा धंदा या हॉस्पिटल मध्ये सुरू असल्याची भूमिका व्यक्त केली. त्यामुळे हॉस्पिटल प्रशासन विरुद्ध लोकप्रतिनिधी यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाची प्रतिक्रिया या दोन्ही पत्रकार परिषदेमधून दिसून आली आहे.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने