धुपेश्वर येथील पुर्णा नदीत आढळला तरणाचा मृतदेह !


मलकापूर.ता :- (पिपल्स टाईम्स वृत्तसेवा) तालुक्यातील धोपेश्वर येथे पूर्णा नदीत आंघोळ करताना युवकाचा पाय घसरून तो पाण्यात बुडाला. तीन दिवसांच्या शोधानंतर त्याचा मृतदेह आढळला. धरणगाव येथील योगेश सुधाकर कवळे (वय २२) व त्याचा मावसभाऊ सुरज वासुदेव कवळे ३० मार्च रोजी दुपारी धोपेश्वर येथे आंघोळीला गेले होते. योगेश हा नदीच्या पायऱ्यांवर बसून आंघोळ करत असताना तोल जाऊन पाण्यात पडला. घाबरलेल्या सुरजने कोणालाही न सांगता घरी धाव घेतली.
नावाडी सुभाष कहाते यांना पायऱ्यांवर कपडे, मोबाइल आणि चप्पल आढळून आले.
संशय आल्याने त्यांनी पोलीस पाटील जितेंद्र पाटील यांना माहिती दिली. दसरखेड एमआयडीसी पोलिसांना याची खबर मिळताच शोधकार्य सुरू करण्यात आले. बुलढाणा येथून एनडीआरएफ पथकही दाखल झाले, मात्र योगेशचा शोध लागला नाही. अखेर, १ एप्रिल रोजी पहाटे त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस अंमलदार राजेश बावणे करीत आहेत.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने