मलकापुरः- तालुक्यात बुधवारी रात्री अवकाळी पावसाने झोडपले असुन मका, ज्वारी व कांदे बिज वगैरे पिकांचे अतोनात नुकसान झाले असून या पिकांचा तात्काळ सर्व्हे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळणेसाठी शिवसेना (उ.बा.ठा) च्या वतीने आज तहसिलदार राहुल तायडे यांना निवेदन देण्यात आले. दि २ एप्रिल चे मध्यरात्री मलकापूर तालुक्यात अवकाळी मूसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मका, ज्वारी, कांदा बिज या पिकाचे अतोनात नुकसान झाले सर्व मका व ज्वारी पिक वादळी हवेने जमिनदोस्त होवून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे तात्काळ सर्वे करून नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी आज शिवसेना शहरप्रमुख गजानन ठोसर, उपशहरप्रमुख बाळू पोलाखरे, कामगार सेना शहर प्रमुख हरीदास गणबास, किसान सेना शहरप्रमुख सै. वसीम सै. रहीम, वाहतूक सेना शहरप्रमुख इम्रान लकी, हसन गौरी, इमामशहा, सै. तोफिक, मो. इसाक तेली सह शिवसैनिकांची उपस्थिती होती.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा