मलकापूर : वायू तंत्रज्ञान क्षेत्रात संधी - मिळविण्यासाठी पद्मश्री डॉ. व्ही. बी. - कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात एडव्हान्स्ड बोल्टिंग सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने - २५ एप्रिल रोजी खुला प्लेसमेंट ड्राइव्ह - आयोजित करण्यात आला आहे.
ही प्रक्रिया सकाळी ९ वाजता - महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित - करण्यात आली आहे. यामध्ये आयटीआय, डिप्लोमा, बीई आणि नॉन-इंजिनिअरिंग - पदवीधरांना सहभागी होता येणार आहे.
नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना रेझ्युम, वयाचा पुरावा व आधार कार्ड, पॅन कार्ड आणि सर्व मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे बरोबर आणावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी २४ एप्रिल ही नोंदणीची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी https://shorturl.at/OnQ4J या लिंकद्वारे ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहिती किंवा मार्गदर्शनासाठी प्रा. आर. एम. चौधरी (९७६६११८९४०) आणि प्रा. पी. व्ही. चोपडे (९०११९७९६१५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन महाविद्यालयाचे प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे आणि प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा. पी. व्ही. चोपडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा