मलकापूर : जैन समुदायावर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात, मुंबईतील जैन मंदिर पाडण्याच्या विरोधात, जैन संतांवरील अमानुष हल्ल्यांविरोधात, जैन तीर्थक्षेत्रांच्या संरक्षणासाठी तसेच पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज, २४ एप्रिल रोजी सकल श्री जैन संघाच्या वतीने जैन एकता रॅली काढण्यात आली.
यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. जैन कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांसह महिला व पुरुषांनी सहभागी होऊन श्वेत वस्त्र परिधान करून, निषेध म्हणून हाताला काळ्या पट्ट्या बांधून, हातात जैन ध्वज आणि घोषणा फलक घेऊन या रॅलीत सहभाग घेतला.
सकल जैन संघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भाजप, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी व मुस्लिम बांधवही या रॅलीत सहभागी झाले, या एकता रॅलीदरम्यान नागरिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवले. सकाळी १०. ४५ वाजता श्री सुमतीनाथ भवन येथून ही रॅली सुरू झाली आणि तहसील कार्यालयात पोहोचल्यानंतर तिचे सभेत रूपांतर झाले.
सर्वप्रथम पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी उत्तमचंद आबड, भरतकुमार दंड, सुहास (बंडू) चवरे यांच्या नेतृत्वात तथा सकल जैन संघाच्या प्रमुख उपस्थितीत ही रॅली काढण्यात आली.
सकल संघाच्या समस्त विश्वस्त मंडळांसह सागर कोचर, रमणिकलाल. पटणी, सुगनचंद आबड, सुगनचंद भंसाली, संतोष संचेती, शिरीष बुरड, वर्धमान पारख, राहुल कोचर, अंकित कोरडिया, उल्हास संचेती, दिशांत चवरे, डॉ. नीरज क्षीरसागर, राहुल जंगम, सचिन क्षीरसागर, प्रदीप चवरे, संजय पेठकर, दिनकर फुलसुंगे, संदेश निरखे, समीर जटाळे, नवल सराफ, आनंद जैन, संदीप नहार, दिनेश दोशी, परेश घिर्णीकर, विजय गोठी, डॉ. योगेश पाटणी, नीरज चवरे, आशिष बांगडे, जय डागा, सर्वेश संचेती, दर्शन भंसाली आदींनी या रॅलीत सहभाग घेतला.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा