मलकापूर: प्रामविकास जलसंधारण विभागाच्या अधिसूचने नुसार तालुक्यातील ४९ ग्राम पंचायतीच्या सरपंचपदांचे आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. त्यानुसार सन् २०२५ ते २०३० दरम्यान तालुक्यातील सार्वत्रिक गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदांची आरक्षण सोडत १६ एप्रिलला प्रशासकीय इमारतीत काढण्यात येणार आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग खुल्या प्रवर्गाअंतर्गत महिलांकरीता आरक्षण सोडत २५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता बुलडाणा येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात काढण्यात येणार आहे.
मलकापूर उपविभागांतर्गत मलकापूर तालुक्यातील महिलांकरीता आरक्षण सोडत दुपारी २ वाजता काढण्यात येणार आहे.
या आरक्षण सोडतीकरिता मलकापूर तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, पक्षांचे राजकीय पदाधिकारी नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन तहसीलदार आर. एम. तायडे यांनी केले आहे.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा