ब्रेकिंग ! मलकापूर शहर पोलिसांची मोठी कारवाई; 1 कोटी 97 लाख 50 हजारांची रोकड घेऊन जात असलेली कार पकडली !

मलकापूर :- मलकापुर-बुलढाणा
रोडवरील बोदवड नाका येथे पोलिसांनी एका सिल्वर रंगाच्या ईरटीगा कारमधून 1 कोटी 97 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. ही कार छत्रपती संभाजीनगर येथील दोन इसम घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ सापळा रचून ही कार अडवली. पोलिस निरीक्षक गणेश गिरी यांच्या नेतृत्वाखाली गाडीची तपासणी केली असता, सीटखाली लपवलेली मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळून आली. विचारणा केली असता संबंधित इसम रकमेबाबत समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कारसह दोघा व्यक्तींना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तहसीलदार, महसूल अधिकारी व बँक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व्हिडीओ शूटिंगसह रोख रकमेची मोजणी करण्यात आली. संपूर्ण रक्कम तात्काळ जप्त करून आयकर विभागाला माहिती देण्यात आली असून रक्कम जिल्हा कोषागारात जमा केली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलिस अधीक्षक श्रेणीक लोढा, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने